Result : JEE च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहता येईल रिझल्ट

ठळक मुद्देएप्रिल 2021 मध्ये जेईईची मुख्य परीक्षा होणार होती. मात्र, कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली
नवी दिल्ली – नॅशनल टेस्टींग एजन्सी म्हणजेच एनटीएने जेईईच्या जुलै 2021 च्या मुख्यम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. आज 6 ऑगस्ट रोजी रात्री 8.00 वाजता हा निकाल वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. परीक्षार्थींना jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.

एप्रिल 2021 मध्ये जेईईची मुख्य परीक्षा होणार होती. मात्र, कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर, मुख्य परीक्षेच्या तिसऱ्या सत्रासाठी जुलै 20, 22, 25 आणि 27 रोजी (2021) ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी देशभरातून 7.09 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

दरम्यान, एकूण 13 भाषांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात येते. इंग्लिश, हिन्दी, गुजराती, आसामी, बंगाली, कन्नड़, मल्याळम, मराठी, ओड़िया, पंजाबी, तमिळ, तेलुगू, उर्दू भाषांचा यामध्ये समावेश आहे.

Aggarwal Scholarship Exam
Enquiry